dr.satish best web design developer for mac

बटकणंगले ग्रामपंचायत :

बटकणंगले हे कोल्हापूर येथील गडहिंग्लज या तालुक्यातील एक विकसित गाव म्हणून पाहिले जाते. आकाराने मध्यम असलेल्या या गावाला निसर्गाचा खूप छान वारसा आहे. म्हणजे गावाच्या सभोवताली हिरवळ शेतजमीन आहे. त्यामुळे हे गाव सुंदर दिसते. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत गावात नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच गावातील ग्रामपंचायतीने गावात विविध योजना राबविल्या आहेत, व त्यातूनच गावाला निर्मल ग्राम पुरस्कार व पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम पुरस्कार मिळाले आहेत.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायत नावाची संस्था कार्यरत असते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. बटकणंगले ग्रामपंचायतीची स्थापना 1957 साली करण्यात आली. ग्रामपंचायतीची इमारत ही साध्याच बांधली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर 8 सदस्यांची नेमणूक केली जाते. ग्रामपंचायत सदस्यांची नेमणूक हि दर पाच वर्षांनी लोकशाही मतातून केली जाते.

सरपंच
सौ. निर्मीती नंदकुमार गोरुले

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. विष्णु टोपाना पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. धोंडीराम आनंदराव काशीद

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Batakanangale Grampanchayat
A/p Batakanangale Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone : 9552906811

Office :02327 – 238072